अनेकदा काही अडचणींमुळे घरात बरकत होत नाही.एखादी व्यक्ती कमाई करून देखील घरात पैसा टिकत नाही. याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. अनेकदा व्यक्तीच्या सवयी देखील यासाठी कारणीभूत ठरतात. मात्र, कधीकधी काही वास्तू दोषांमुळे आर्थिक प्रगतीत बाधा येऊ शकते. जर तुम्हालाही अशीच वारंवार आर्थिक चणचण भासत असेल, तर वास्तू शास्त्रात सांगितल्यानुसार ‘या’ गोष्टी आपल्या घरात नक्की ठेवा.
चांदी : नवरात्री किंवा दिवाळीत चांदी खरेदी करून ते घरात ठेवणे शुभ मानले जाते. ज्या घरात चांदीच्या वस्तू असतात, त्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत असते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच संपत्तीतही वाढ होते.
तुळशीचे रोप : वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने वास्तु दोषांचा प्रभाव कमी होतो. या व्यतिरिक्त घरातील सदस्यांना वाईट नजर लागत नाही, ज्यामुळे ते कमी वेळात यश मिळवू शकतात.
मातीचा मटका : कोणत्याही सणासुदीच्या दिवशी मातीचा माठ किंवा सुरई खरेदी करणे शुभ मानले जाते. नवीन भांडे हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे एखाद्या खास दिवशी मातीचा माठ घरी आणला, तर तो तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो.
शंख : घरात शंख ठेवणे शुभ असते. जर, तुमच्या घरात शंख नसेल, तर एखाद्या शुभ प्रसंगी तुम्ही शंख विकत घेऊन तुमच्या घरात आणून तुमच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवू शकता. यामुळे घरात सकारात्मकता येते. याशिवाय घरातील सदस्यांवर माता लक्ष्मीची कृपा राहते.