Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजची निर्मिती रुसो ब्रदर्स करत आहेत. ‘सिटाडेल’ ही एक सायन्स ड्रामा वेब सीरिज आहे.
(1 / 9)
ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास हिने नुकतीच ‘सिटाडेल’ या आगामी वेब सीरिजमधील तिच्या पात्राचे अनेक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. (Photo: @priyankachopra/IG)
(2 / 9)
प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून असा अंदाज लावला जात आहे की, प्रियांका यावेळी खूप अॅक्शन सीन्स करणार आहे. या सीरिजमधील तिचे हे नवे पात्र तिच्या जुन्या स्टाईलपेक्षा खूप वेगळे असणार आहे. (Photo: @priyankachopra/IG)
(3 / 9)
प्रियांका व्यतिरिक्त या सीरिजमधील इतर प्रमुख पात्रांची झलक दाखवण्यात आली आहे. प्रियांकाने एकूण नऊ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती हातात पिस्तूल घेऊन बसलेली आहे. तिचा हाच धाकड लूक इतर फोटोंमध्येही दिसत आहे. (Photo: @priyankachopra/IG)
(4 / 9)
‘सिटाडेल’ या वेब सीरिजची निर्मिती रुसो ब्रदर्स करत आहेत. ‘सिटाडेल’ ही एक सायन्स ड्रामा वेब सीरिज आहे. (Photo: @priyankachopra/IG)
(5 / 9)
या सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्या पात्राचे नाव एजंट नादिया असे आहे. (Photo: @priyankachopra/IG)
(6 / 9)
तर, रिचर्ड मॅडनने मेसन केन यांनी सिटाडेल एजंटची भूमिका केली आहे. स्टॅनली टुसी एक्स देखील एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo: @priyankachopra/IG)
(7 / 9)
या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये एकूण ६ एपिसोड असतील. त्यापैकी दोन एप्रिल महिन्यामध्ये रिलीज होणार आहेत. (Photo: @priyankachopra/IG)
(8 / 9)
‘द रिंग्ज ऑफ पॉवर’नंतर ‘सिटाडेल’ ही प्राईमची सर्वात महागडी वेब सीरिज असल्याचे म्हटले जात आहे. ‘सिटाडेल’चे प्रारंभिक बजेट सुमारे १६० दशलक्ष डॉलर होते, अशी माहिती समोर आली होती. (Photo: @priyankachopra/IG)
(9 / 9)
परंतु, आता यात आणखी ७५ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. प्रियांकाने एक फोटो शेअर करून २०२१ मध्ये सिटाडेलचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली होती, ज्यामध्ये तिचा चेहरा धुळीने माखलेला दिसला होता. (Photo: @priyankachopra/IG)