
ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड इंडस्ट्रीतही एक मोठे नाव बनली आहे. प्रियांका सध्या तिच्या आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’मुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या संपूर्ण टीमसोबत सीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, यात खास गोष्ट म्हणजे प्रियांकासोबत तिचा पती निक जोनासही तिच्या प्रत्येक प्रमोशनला सोबत दिसतो. (Photo: @priyankachopra/IG)
आतापर्यंत निक अनेक ठिकाणी ‘सिटाडेल’च्या प्रमोशनच्या सेटवर दिसला आहे. निक आपल्या सुंदर पत्नीवरून स्वतःची नजरही हटवू शकत नाहीय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियांका नुकतीच रोमला पोहोचली होती, जिथे निकही तिच्यासोबत होता. (Photo: @priyankachopra/IG)
यादरम्यान प्रमोशनमधून वेळ काढून अभिनेत्रीने पतीसोबत रोमँटिक फोटोशूट केले. नुकतेच प्रियांका चोप्राने निकसोबतचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पुन्हा एकदा दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo: @priyankachopra/IG)
या स्टार कपलचे नवे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती पीसी ग्रास कलरच्या डीपनेक आउटफिटमध्ये दिसत आहे. त्यासोबत तिने फेदर श्रग देखील कॅरी केला आहे. (Photo: @priyankachopra/IG)


