मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  प्रियांका चोप्राच्या घरी वाजणार सनई चौघडे! पार पडला अभिनेत्रीच्या भावाचा ‘रोका’; पाहा खास फोटो

प्रियांका चोप्राच्या घरी वाजणार सनई चौघडे! पार पडला अभिनेत्रीच्या भावाचा ‘रोका’; पाहा खास फोटो

Apr 03, 2024 11:13 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Priyanka Chopra Brother Roka: प्रियंका चोप्राने एक गोड मेसेज लिहित तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि त्याची होणारी पत्नी नीलम उपाध्याय यांच्या रोका सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या भावाचा रोका सेरेमनी नुकताच पार पडला आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिद्धार्थ चोप्रा आणि त्याची होणारी पत्नी नीलम उपाध्याय या समारंभात सुंदर दिसत होते. या फोटोत सिद्धार्थने फिकट गुलाबी रंगाची शेरवानी आणि पांढरा पायजामा घातला होता, तर नीलमने जांभळ्या रंगाचा आउटफिट घातला होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

यावेळी प्रियांका चोप्राने लाल साडी आणि मॅचिंग ब्लाउज परिधान केला होता. तर, पांढरा कुर्ता-पायजामा आणि बेज जॅकेट घातलेला निक जोनास या फोटोंमध्ये तिच्या शेजारी उभा राहिलेला दिसला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

नीलमने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासने देखील एक क्युट आउटफिट घातला होता. मालती मेरीने तिच्या आईसोबत ट्वीनिंग करत लाल ड्रेस घातला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

प्रियांका चोप्रा, निक जोनाससह सिद्धार्थ, नीलम आणि कुटुंबातील काही सदस्य या फोटोंमध्ये दिसत आहेत. प्रियांकाने सिद्धार्थची एक पोस्ट पुन्हा शेअर केली आणि या जोडीचे अभिनंदन केले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

नीलमने मंगळवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या अनेक फोटोंपैकी एका फोटोमध्ये समारंभासाठी आणलेल्या खास केकची झलक दाखवली आहे. आकाशी रंगाच्या केकवर 'जस्ट रोकाफाईड' अशी अक्षरे, फुले आणि छोटी पाने लावून डिझाईन केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांनी त्यांच्या पालकांसोबत फोटो पोज दिल्या. खास सोहळ्यासाठी झेंडूच्या फुलांनी घराची सजावट करण्यात आली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांनी त्यांच्या पालकांसोबत फोटो पोज दिल्या. खास सोहळ्यासाठी झेंडूच्या फुलांनी घराची सजावट करण्यात आली होती.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज