priyank panchal wedding : गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या प्रियांक पांचाल विवाह बंधनात अडकला आहे. त्याने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(1 / 4)
भारतात सध्या क्रिकेटचा उत्सव म्हणजेच आयपीएलचा (IPL 2024) थरार सुरू आहे. चाहते त्यांच्या आवडत्या संघांना सपोर्ट करण्यात व्यस्त आहेत. पण याच दरम्यान एका भारतीय क्रिकेटपटूने लग्नगाठ बांधली आहे.
(2 / 4)
वास्तविक, गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या प्रियांक पांचाळने आयपीएल २०२४ दरम्यान लग्नगाठ बांधली आहे. त्यांने क्रीडा मानसशास्त्रज्ञ (स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट) कलना शुक्ला हिच्याशी विवाह केला.
(3 / 4)
गुजरातच्या माजी कर्णधार असलेल्या प्रियांक पांचाळने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
(4 / 4)
याआधी प्रियांकने त्याच्या एंगेजमेंटची माहितीही शेअर केली होती. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी एंगेजमेंट केली होती. आता त्यांचा विवाहसोहळा पार पाडला.
(5 / 4)
प्रियांकने आत्तापर्यंत आपल्या करिअरमध्ये १२० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, १९६ डावांमध्ये फलंदाजी करत त्याने ४५.५२ च्या सरासरीने ८४२३ धावा केल्या आहेत.