हा चित्रपट जगातील सर्वात शापित चित्रपट मानला जातो. कारण चित्रपटगृहात हा चित्रपट पाहताना अनेक लोकांना हृदयविकाराचा झटका आला होता. काही महिलांचा गर्भपात झाला होता. परिस्थिती अशी झाली होती की, अमेरिकेत जिथे हा चित्रपट दाखवला जात होता, तिथे प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या होत्या.
या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान या चित्रपटाशी संबंधित २० जणांचा मृत्यू झाला होता. या चित्रपटाचा सेट जळला, ज्यात ९ जणांचा मृत्यू झाला. पण, ज्या खोलीत भूताचा सीन शूट होणार होता, ती खोली मात्र अजिबात खराब झाली नाही. तिथे एक ठिणगीही पोहोचली नव्हती.
‘द एक्सॉर्सिस्ट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या मुलीचे नाव आहे लिंडा ब्लेअर.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, लिंडा ब्लेअरला पाठीला दुखापत झाली, ज्यामुळे तिला आयुष्यभर त्रास झाला. क्लायमॅक्स सीनमध्ये, ब्लेअरला फक्त पातळ गाऊन घालून उणे २८ अंश सेल्सिअस तापमानात शूट करावे लागले, ज्यामुळे ती अशा आजाराला बळी पडली की, ती आयुष्यभर त्यातून बरी होऊ शकली नाही.
१९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द एक्सॉर्सिस्ट' या चित्रपटाचा प्रीमियर सोळाव्या शतकातील चर्चच्या समोर एका ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळाने वीज पडली आणि त्या चर्चचा क्रॉस तुटून जमिनीवर पडला.