राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना दीड लाख रुपये पेन्शन मिळते. याशिवाय, भाडेमुक्त घर, दोन मोफत लँडलाईन फोन, मोबाईल फोन, कर्मचारी आणि मोफत प्रवास यासारख्या सुविधा त्यांना पुरविल्या जातात. याशिवाय, त्यांच्या पती किंवा पत्नीला दरमहा ३०,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. राष्ट्रपतींना मोफत राहण्याची व्यवस्था आणि कार्यालयीन खर्चासाठी दरवर्षी १ लाख रुपये मिळतात.
(Rahul Singh)उपाध्यक्ष जगदीप धनखड : मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताच्या उपराष्ट्रपतींचा पगार दरमहा ४ लाख रुपये आहे. २०१८ मध्येच तत्कालीन अर्थमंत्र्यांनी दरमहा १.२५ लाख रुपयांवरून ४ लाख रुपये पगार वाढवण्याची घोषणा केली होती. उपराष्ट्रपतींना मोफत निवास, वैयक्तिक सुरक्षा, वैद्यकीय, विमान किंवा रेल्वे प्रवास, लँडलाइन, मोबाईल फोन आणि कर्मचारी मिळतात. तसेच विविध भत्ते देखील दिले जातात.
(Ritik Jain )पंतप्रधान नरेंद्र मोदी : एनडीटीव्ही आणि इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, भारताच्या पंतप्रधानांना दरमहा १.६६ लाख रुपये दरमहा पगार मिळतो. यामध्ये ४५,००० रुपये संसदीय भत्ता, ३,००० रुपये खर्च भत्ता, २,००० रुपये दैनिक भत्ता आणि ५०,००० रुपये मूळ वेतन समाविष्ट आहे. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ७, लोक कल्याण मार्ग, दिल्ली आहे. पंतप्रधानांच्या प्रवासासाठी एअर इंडिया वन विमान उपलब्ध असतं. .
(HT_PRINT)