पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण २९ पदके जिंकली. यापैकी ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदके होती. भारताने यापूर्वी कधीही इतकी पदके जिंकलेली नाहीत.
(all photos -PTI)इतिहास घडल्यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पॅरा ॲथलीटची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला. त्याचे अभिनंदन केले.
पीएम मोदींनी अवनी लेखराच्या डोक्यावर हात ठेवला- पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. पंतप्रधान मोदी जेव्हा तिला भेटले तेव्हा त्यांनी अवनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला शाबासकी दिली.
पीएम मोदींनी कपिल परमारच्या पदकावर स्वाक्षरी केली- पॅरालिम्पिक २०२४ मध्ये, भारताच्या कपिल परमारने ज्युदोच्या ६० किलो J1 स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकले. कपिलने पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी ज्युदोमध्ये पहिले पदक जिंकले आहे. पंतप्रधानांनी त्याच्या पदकावर स्वाक्षरी केली.
पीएम मोदींनी खेळाडूंसोबत गप्पा मारल्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पॅरा ॲथलीट्सची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्याशी एक एक करत संवाद साधला.