PM Modi inaugurates Mumbai Trans Harbour Link road : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब व जगातील १० व्या क्रमाकांच्या लांबीच्या सागरी मार्गाचे लोकार्पण केले. या पुलाच्या उद्घाटनात मोदी यांचा खास स्वॅग पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी या पूलावरून वॉक घेत कामाचे कौतुक केले.
(1 / 6)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब व जगातील १० व्या क्रमाकांच्या लांबीच्या सागरी मार्गाचे लोकार्पण केले. या पूलामुळे दक्षिण मुंबईत ते नवी मुंबईत हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. यापूर्वी हे अंतर दोन तासांचे होते.
(2 / 6)
या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. मोदी यांचे जॅकेट नेहमी चर्चेत असते. या कार्यक्रमाला देखील त्यांनी खास जॅकेट परिधान केले होते.
(3 / 6)
पुलाचे उद्घाटन झाल्यावर मोदी यांनी या पुलावरुन भटकंती केली. या पुलावरुन चालत असतांना त्यांची खास फोटो टीपण्यात आले. हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून मोदी यांच्या या स्वॅगची चर्चा देखील तरुणांमध्ये होती.
(4 / 6)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
(5 / 6)
मोदी यांनी या पुलावरन वॉक घेतल्यावर हा पूल बांधण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधला. त्यांनी तयार केलेल्या या पुलाच्या कामाचे कौतुक त्यांनी कामगारांशी बोलून केले.
(6 / 6)
अटल सेतु जवळपास २१.८ किलोमीटर लांबीचा व सहा पदरी समुद्री पूल आहे. याची लांबी समुद्रात साडे १६ किलोमीटर तर जमिनीवर ५ किलोमीटर आहे. या पुलासाठी १७,८४० कोटीहून अधिक खर्च झाला आहे.