चिमूकल्यांच्या किलबिलाटाने बहरल्या शाळा! पुण्यात ढोल ताशांच्या गजरात तर कुठे फूल देऊन स्वागत; पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  चिमूकल्यांच्या किलबिलाटाने बहरल्या शाळा! पुण्यात ढोल ताशांच्या गजरात तर कुठे फूल देऊन स्वागत; पाहा फोटो

चिमूकल्यांच्या किलबिलाटाने बहरल्या शाळा! पुण्यात ढोल ताशांच्या गजरात तर कुठे फूल देऊन स्वागत; पाहा फोटो

चिमूकल्यांच्या किलबिलाटाने बहरल्या शाळा! पुण्यात ढोल ताशांच्या गजरात तर कुठे फूल देऊन स्वागत; पाहा फोटो

Published Jun 15, 2024 01:52 PM IST
  • twitter
  • twitter
  • School Start : राज्यात आज तब्बल दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टी नंतर विद्यार्थ्यांचे वाजत गाजत शाळांमध्ये स्वागत करण्यात आले. पुण्यात देखील जिल्हा परिषद आणि महागर पालिकेच्या शाळेत वाजत गाजत आणि बैलगाडीतून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले.
 राज्यभरातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे. पुण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याना बैलगाडीत बसवून शाळेत आणण्यात आले.  पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे ढोल ताशांच्या गजरात मुलांचे स्वागत करण्यात आले.  टिळक रस्त्यावरील डीईएस स्कूलमध्ये मुलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. वर्गात उत्साही वातावरणात मुलांचे स्वागत करत असतांना शिक्षिका.  
twitterfacebook
share
(1 / 9)

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे ढोल ताशांच्या गजरात मुलांचे स्वागत करण्यात आले.  शाळेतील सीनियर विद्यार्थ्यांनी मुलांना फुले देऊन त्यांचे स्वागत केले. 
twitterfacebook
share
(2 / 9)

टिळक रस्त्यावरील डीईएस स्कूलमध्ये मुलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. वर्गात उत्साही वातावरणात मुलांचे स्वागत करत असतांना शिक्षिका.  
twitterfacebook
share
(3 / 9)

पुण्यातील काही शाळांमध्ये सेल्फी बूथ देखील लावण्यात आले होते. अनेक चिमूकल्यांनी येथे येत फोटो काढून घेतले.   
twitterfacebook
share
(4 / 9)

पुण्यातील शनिवार पेठेतील नूतन विद्यालयात फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावरून मुलांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी मुलांना गुलाब पुष्प तर काही ठिकाणी खाऊ देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले.
twitterfacebook
share
(5 / 9)

शाळेच्या पहिल्या दिवशी पालक देखील उत्साही होते. मुलांच पुस्तके, वॉटर बॅग तसेच शाळेच्या युनिफॉर्ममध्ये मुलांना पाठवले. काही मुले शाळेचा पहिला दिवस असल्याने भेदरली तर काहीच्या चेहऱ्यावर शाळेत जाण्याचा उत्साह होता. 
twitterfacebook
share
(6 / 9)

काही शाळांनी मुलांच्या स्वागतासाठी टॉय देखील आणले होते. या टॉयला पाहून मुलांच्या चेहेऱ्यांवरील आनंद द्विगुणित झाला होता. 
twitterfacebook
share
(7 / 9)

पुण्यातील नूतन विद्यालयाने शाळेत पहिल्यांदा दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांच्या प्रती त्यांना भेट म्हणून दिल्या. 
twitterfacebook
share
(8 / 9)

या सोबतच मुलांना चॉकलेटचे देखील वाटप करण्यात आले.  पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांत शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचा  प्रवेशोत्सव साजरा केला गेला. तर काही शालात  मुलांना पुस्तके देण्यात आली. कुठे विद्यार्थ्यांचं औक्षण करुन त्यांना शाळा प्रवेश देण्यात आला.  विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी अभ्यास न देता अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रवेशोत्सव साजरा केला गेला. 
twitterfacebook
share
(9 / 9)

इतर गॅलरीज