मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे पूजन, पाहा Photos

जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे पूजन, पाहा Photos

May 02, 2024 12:34 AM IST Shrikant Ashok Londhe

President Draupadi murmur in ayodhya : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होत्या. तेथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढीमध्ये दर्शन-पूजन केले त्यानंतर शरयू नदीची महाआरती केली. राम मंदिरात जाऊन राष्ट्रपती रामललाच्या चरणी नतमस्तक झाल्या.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राम मंदिरात जाऊन रामलल्लाच्या दरबारात दंडवत प्रणाम केला. याचे फोटो श्रीराम मंदिर ट्रस्ट व राष्ट्रपतींनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.  राष्ट्रपतींनी रामलल्लाची आरती केली व त्यांना दंडवत प्रणाम केली. रामलल्लाच्या दर्शनानंतर त्या खूपच खुश दिसत होत्या. राष्ट्रपती पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आल्या होत्या. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

द्रौपदी मुर्मू यांनी सर्वप्रथम हनुमान गढी येथे जाऊन रामभक्त हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी हनुमानाची मनोभावे आरतीही केली. द्रौपदी मुर्मू यांचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्यावतीने सत्कार, सन्मान करण्यात आला. द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिराची प्रतिकृती आणि रामललाची प्रतिमा भेट देण्यात आली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

द्रौपदी मुर्मू यांनी हनुमानगढीनंतर शरयू तीरावर जाऊन नदीचे पूजन आणि आरती केली. २२ जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रपतींना निमंत्रण न देण्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा लावून धरण्यात आला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौरा करत रामलल्लाच्या चरणी लीन झाल्या.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुबेर टीला येथे भेट देऊन पूजा केली. रामलल्लाच्या दरबारात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दर्शन-पूजन वेळी अनेक वेळा भावुक झाल्याचे दिसून आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी जटायू पुतळ्यालाही फुले वाहून नमस्कार केला. रामलल्लाच्या दर्शनानंतर राष्ट्रपतींनी परिसरात फोटो काढले. यावेळी राज्यपाल आनंदी बेन पटेलही उपस्थित होत्या. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामललाचे दर्शन घेतले. द्रौपदी मुर्मू यांचे रामललाबद्दल असलेले समर्पणही दिसले. त्या रामललासमोर नतमस्तक झाल्या. आरती केली. पंतप्रधान आणि राष्ट्रपती रामलला प्रति किती समर्पित आहे, हेच यातून दिसून येते, असे सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विशेष विमानाने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अयोध्येत दाखल झाल्या. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना व्हीआयपी गेटने मंदिर परिसरापर्यंत आणले गेले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त बुधवारी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. विमानतळापासून राम मंदिर व शरयू किनारी कमांडो तैनात होते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज