१) जिओचा ३९९ रुपयांचा प्लान: हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलसह दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड्ससारखे फायदे आहेत.
२) जिओचा २०२५ रुपयांचा प्लान:
हा प्लान २०० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलसह दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ जिनेमा आणि जिओ क्लाउड्ससारखे फायदे मिळतात.
३) जिओचा ३ हजार ५९९ रुपयांचा प्लान
हा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलसह दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय, या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ जिनेमा आणि जिओ क्लाउड्ससारखे फायदे मिळत आहेत.
४) जिओचा ३ हजार ९९९ रुपयांचा प्लान:
हा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलसह दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये फॅनकोड सबस्क्रिप्शन जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड्स यासारखे फायदे दिले जात आहेत. या प्लानवर प्रजासत्ताक दिनाची ऑफर देखील उपलब्ध आहे.
५) एअरटेलचा ४२९ रुपयांचा प्लान: हा प्लान एक महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलसह दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एअरटेल एक्स्ट्रीम ॲप, अपोलो २४/७ सर्कल आणि विनामूल्य हॅलोट्यून्स यांसारखे फायदे मिळतात.