‘टाईमपास’ या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परब आता बोहल्यावर चढणार आहे.
दरम्यान, त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. हळदी आणि मेहंदी समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्रथमेश आणि क्षितिजाचा विवाहसोहळा २४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. हळदी समारंभातील काही खास क्षण प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने हळदी समारंभात प्रचंड धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नासाठी खास ‘प्रतिजा’ हा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. क्षितिजाच्या हातावरील मेहंदीवर प्रेक्षकांना ‘प्रतिजा’ या हॅशटॅगची झलक पाहायला मिळते.