Prathamesh Parab: काहीच दिवसांपूर्वी प्रथमेशच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याने प्री वेडिंगचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(1 / 5)
‘टाईमपास’ या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परबचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत त्याने गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा केला होता.
(2 / 5)
काहीच दिवसांपूर्वी प्रथमेशच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याने प्री वेडिंगचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(3 / 5)
प्रथमेश परबच्या या प्रीवेडिंग फोटोशूटमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसले आहेत. प्रथमेश याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा, तर क्षितिजा घोसाळकर हिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
(4 / 5)
‘जिथे सागरा धरणी मिळते’ अशा आशयाचे कॅप्शन देत क्षितिजा आणि प्रथमेश यांनी त्यांचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
(5 / 5)
क्षितिजा आणि प्रथमेश यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘टाईमपास’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच झाली होती. आता लवकरच ही जोडी लग्न बंधनात अडकणार आहे.