मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच आपल्या आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.
(All Photos : Instagram)नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम देखील दिसत होती.
प्राजक्ता माळी सध्या भटकंतीवर आहेत. ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमसोबत सिंगापूरमध्ये धमाल करत आहे. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, चेतना भट, रोहित माने हे देखील प्राजक्ता माळीसोबत सिंगापूरमध्ये धमाल करत आहेत.