Pradosh vrat march 2024 : यंदा वर्ष २०२४ मध्ये मार्च महिन्यात महाशिवरात्री आणि प्रदोष व्रत एकाच दिवशी येत आहे. यामुळे या दिवसाचे महत्व आणखी वाढले आहे. जाणून घ्या प्रदोष व्रत मुहूर्त, शुभ योग व उपाय.
(1 / 6)
हिंदू धर्मात प्रदोष व्रत व महाशिवरात्रीचे व्रत करण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. यावर्षी हे महत्व आणखी वाढणार आहे कारण महाशिवरात्रीलाच प्रदोष व्रत असून, शिवपूजनाचे दुप्पट लाभ मिळणार आहे.
(2 / 6)
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्रीचा उत्सव ८ मार्चला आहे. या दिवशी विधीनुसार भगवान शंकराची पूजा केली जाते आणि व्रत पाळले जाते. यावेळी महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जाते, कारण या दिवशी शुक्र प्रदोष व्रताचा योगायोग आहे.
(3 / 6)
शुक्रवा ८ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, सिद्ध योग आणि चतुर्ग्रही योग यांचा संयोग होत आहे. या दिवशी शनि कुंभ राशीवर मूळ त्रिकोणात बसलेला आहे. त्याच्यासोबत सूर्य, चंद्र आणि शुक्र देखील उपस्थित आहेत. याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्र प्रदोष व्रत देखील आहे. अशा परिस्थितीत हा अद्भुत योगायोग विशेष फलदायी ठरत आहे. या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने अनेकविविध फळ प्राप्त होतात.
(4 / 6)
महाशिवरात्री व प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजन मनोभावे केले पाहिजे. यादिवशी व्रताचा संकल्प घेऊन व्रत करावे व विशेष फळ प्राप्तीसाठी पाणी, दूध, दही, तूप, पंचामृत महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे.
(5 / 6)
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मंदिर स्वच्छ करून दिवा लावावा. प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची प्रथा आहे.
(6 / 6)
यावेळी भगवान भोलेनाथांना गंगाजलाने अभिषेक करा. त्यानंतर भगवान शंकराला धोतरा, शमीची पाने आणि बिल्वची पाने इत्यादी अर्पण करा. शेवटी आरती करा आणि शिवचालीसाचा पाठ करा. भोग अर्पण करा आणि लोकांमध्ये प्रसाद वाटप करा.