शिवपुराणानुसार, प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. प्रदोष व्रत करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रताचे पालन केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. या महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत २१ फेब्रुवारी २०२४ रोजी पाळण्यात येणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये प्रदोष व्रताचे काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे ते जाणून घ्या.
पंचांगानुसार, फेब्रुवारी महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. माघ शुक्लपक्षातील त्रयोदशी तिथी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी सुरू होईल. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी संपेल.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला सिंदूर, हळद, तुळशी, केतकी आणि नारळाचे पाणी अजिबात अर्पण करू नये. यामुळे या व्रताचा लाभ मिळत नाही असे सांगितले जाते.
(Unsplash)प्रदोष व्रताला महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये. असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरे जावे लागते, असे सांगितले जाते.
तामसिक पदार्थामुळे तमोगुण वृद्धींगत होतात आणि व्रत वैकल्य करताना सात्विक राहील्यास मन शांत राहण्यास मदत होते. यामुळे या दिवशी मद्य, मांस, कांदा, लसूण, तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
या दिवशी कोणालाही शिवीगाळ करणे टाळावे. कोणाही विषयी वाईट चित्तू नये. प्रदोष व्रताच्या दिवशी उशीरापर्यंत झोपू नये. कारण याचा दोष आपणास लागतो,
(Freepik)