बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, कमल हासन आणि दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.
(HT_PRINT)'कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने किती कमाई केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण बिग बजेट सिनेमा, त्यात साऊथ आणि बॉलिवूडचे सुपरस्टार कलाकार या चित्रपटात आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरला आहे की नाही हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत.
(HT_PRINT)Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार 'कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. देशात या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी 'कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने तेलुगु भाषेत ६१.५ कोटी रुपये कमावले आहेत, तमिळ भाषेत २३.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर कन्नड भाषेत ३० लाख, तर मल्याळममध्ये २.२ कोटी कामावले आहे. हिंदीमध्ये ही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल आहे. हिंदीमध्ये चित्रपटाने २३.५ कोटी कमावले आहेत.
(AFP)