Wheat Market In India : चार महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं गव्हाची निर्यातबंदी करण्याची घोषणा केली होती. परंतु भारतात गव्हाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता अन्न महामंडळानं जारी केलेल्या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
(1 / 5)
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं जगातील अनेक देशांमध्ये गव्हाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळं भारतानं देशात असलेल्या गव्हाच्या साठ्यातून कोणतीही निर्यात न करण्याचा निर्णय घेतला होता.(HT)
(2 / 5)
देशात अन्नधान्याचा पूरेसा साठा रहावा, यासाठी केंद्रानं गव्हाच्या निर्यातबंदीची घोषणा केली होती. परंतु आता भारतातच गव्हाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भारतीय अन्न महामंडळाच्या म्हणण्यानुसार, १९९८ नंतर भारतात पुन्हा गव्हाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यावर्षी देशात आवश्यक प्रमाणात गव्हाचं उत्पादन झालेलं नाही.(REUTERS)
(3 / 5)
परंतु केंद्र सरकारनं देशात गव्हाच्या तुटवड्यासंदर्भातील वृत्त फेटाळलं आहे, देशात अन्नधान्याचा पूरेसा साठा उपलब्ध असून त्याची वितरण व्यवस्था भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध नाही, असं केंद्रानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.(AP)
(4 / 5)
गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, देशात दरवर्षी विक्रमी गव्हाचं उत्पादन होत असल्यानं भारत नेहमीच गव्हाची निर्यात करत असतो. परंतु युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारत सरकानं गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.(HT_PRINT)
(5 / 5)
सध्या देशात अन्नधान्यांचे भाव स्थिर असले तरी भविष्यात धान्यांच्या टंचाईची भीती तज्ञांनी व्यक्त केली होती. परंतु आता सरकारनं यावर स्पष्टीकरण देत देशात पुरेसा धान्यसाठा असल्याचं म्हटलं आहे.(REUTERS)