Pola Amavasya 2024 : आज पोळा आणि पिठोरी अमावस्या आहे. तसेच शेवटचा श्रावण सोमवारही आहे. या दिवशी काही खास गोष्टी केल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते, लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अमावस्येच्या दिवशी काय करावे ते जाणून घ्या.
(1 / 6)
श्रावण सोमवारचे व्रत भगवान शंकराला समर्पित आहे, तसेच अमावस्येलाही स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी धनप्राप्तीसाठी काही गोष्टी केल्यास देवी लक्ष्मी तुम्हाला सदैव सुख-समृद्धी देईल.
(2 / 6)
अमावस्येला सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुळशीमातेची पूजा करावी. पाण्यात चंदन आणि गूळ मिसळून तुळशीच्या रोपाला जल अर्पण करा. त्यानंतर तुळशीच्या रोपाची पूजा करून तुपाचा दिवा लावावा. तुळशीच्या झाडाची १०८ वेळा प्रदक्षिणा करावी. यामुळे तुमच्या घरातील संपत्ती वाढते. लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
(3 / 6)
अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा. पिंपळाच्या वृक्षाची १०८ वेळा प्रदक्षिणा करावी. पूजेमध्ये १०८ फळे ठेवा आणि प्रत्येक प्रदक्षिणेसाठी स्वतंत्रपणे एक फळ अर्पण करा. पूजेनंतर सर्व फळे गरजूंना दान करा.
(4 / 6)
अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्यात लाल मीठ टाकून त्यात केशर टाका. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. तुमचे घर संपत्तीने भरले जाईल. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल.
(5 / 6)
अमावस्येला गव्हाचे पीठ गूळ किंवा साखर मिसळून काळ्या मुंग्यांना खाऊ घालावे. असे केल्याने तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल. तुमचे पूर्वज सुखी होतील. सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल.
(6 / 6)
अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी कडुलिंब, आवळा आणि केळीची झाडे लावल्यास जीवनात सुख-समृद्धी वाढते. ग्रह दोष दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.