Gaganyaan mission : भारताच्या महत्वाकांशी गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट पुढे आली आहे. या मोहिमेसाठी लागणारे इंजिन तयार झाले असून त्याला मानवी मानांकन देखील मिळाले आहे. यानंतर या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांची देखील घोषणा करण्यात आली आहे. या मोहिमेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
(1 / 12)
केरळच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगनयानचा भाग असणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली. थुंबा, तिरुवनंतपुरम. येथून ही मोहीम सुरू होणार आहे.(PTI)
(2 / 12)
"अंतराळ क्षेत्रातील भारताचे यश देशातील तरुण पिढीमध्ये वैज्ञानिक जाणिवेची बीजे पेरत आहे, असे प्रतिपादन विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (PTI)
(3 / 12)
"भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत स्थान मिळवणार आहे. त्याच वेळी देशाचे गगनयान देखील आपल्या अंतराळ क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेणार आहे," असे मोदी म्हणाले. (PTI)
(4 / 12)
PM मोदींनी गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात अंतराळवीरांना 'अंतराळवीर पंख' बहाल केले. (PTI)
(5 / 12)
पंतप्रधान मोदी म्हणाले की ते चार अंतराळवीर देशाची शक्ती आहेत. यांच्याकडून देशातील १.४ अब्ज लोकांच्या आकांक्षा आहेत. (PTI)
(6 / 12)
चार दशकांनंतर, चार भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहे. यावेळी उलटी गिनती, वेळ आणि अगदी रॉकेट देखील स्वदेशी राहणार आहे, असे मोदी म्हणाले. (PTI)
(7 / 12)
तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ला भेट देताना केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत पंतप्रधान मोदी. (PTI)
(8 / 12)
गगनयान मानवी उड्डाण मोहिमेमध्ये वापरले जाणारे बहुतांश तंत्रज्ञान भारतातच बनवले असून याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला. (PTI)
(9 / 12)
पंतप्रधान मोदींनी देशाच्या अंतराळ कार्यक्रमात महिलांनी बजावलेल्या "महत्त्वाच्या भूमिकेवर" भर दिला. ते म्हणाले, चांद्रयान आणि गगनयान सारख्या मोहिमा त्यांच्या योगदानाशिवाय आणि सहभागाशिवाय शक्य होणार नाहीत. (PTI)
(10 / 12)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या तीन प्रमुख तांत्रिक सुविधांचे उद्घाटन करण्यासाठी PM मोदी VSSC येथे होते.(PTI)
(11 / 12)
अंतराळवीर देशाच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी प्रशिक्षण घेत आहेत, गगनयान.(PTI)
(12 / 12)
गगनयान मोहीम हा भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे ज्यासाठी इस्रोच्या विविध केंद्रांवर व्यापक तयारी सुरू आहे.(PTI)