पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अरबी समुद्रावरील बेट द्वारका बेटाला गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील ओखा मुख्य भूमीशी जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब केबल-स्टेड २.३२ किमी लांबीच्या 'सुदर्शन सेतू' पुलाचे उद्घाटन केले.
(X/@narendramodi)गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) राज्यप्रमुख सीआर पाटील हेही यावेळी उपस्थित होते.
(PTI)हा पूल वैशिष्ट्य पूर्ण बांधण्यात आला आहे. तसेच याची रचनाही अनोखी आहे, ज्यात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांनी सुशोभित केलेला फूटपाथ आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमा आहेत.
(PTI)२.३२ किमीचा पूल, ज्यामध्ये मध्यवर्ती दुहेरी-स्पॅन केबल-स्टेड भागाचा ९०० मीटरचा भाग आणि २.४५ किमी लांबीचा ॲप्रोच रोड, अधिकृत प्रकाशनानुसार, ९७९ कोटी रुपयांमध्ये बांधण्यात आला आहे.
(PTI)बेट द्वारका हे ओखा बंदराजवळील एक बेट आहे. हे द्वारका शहरापासून जवळपास ३० किमी अंतरावर आहे, जेथे भगवान कृष्णाचे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे.
(PTI)