Highest Dam in India : देशातील सर्वात उंच धरणाची पायाभरणी झाली! पाहा Photo
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Highest Dam in India : देशातील सर्वात उंच धरणाची पायाभरणी झाली! पाहा Photo

Highest Dam in India : देशातील सर्वात उंच धरणाची पायाभरणी झाली! पाहा Photo

Highest Dam in India : देशातील सर्वात उंच धरणाची पायाभरणी झाली! पाहा Photo

Mar 09, 2024 01:24 PM IST
  • twitter
  • twitter
Biggest dam in India : देशातील सर्वात उंच धरण अशी चर्चा असलेल्या दिबांग मल्टीपर्पज प्रोजेक्टचं (Dibang Hydropower Project) अर्थात धरणाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. हे धरण चीनच्या सीमेला लागून आहे.
अरुणाचल प्रदेशातील लोअर दिबांग खोऱ्यातील दिबांग नदीवर हे धरण तथा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून वर्षाकाठी २८८० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते. या प्रकल्पासाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह वळविण्यासाठी चीननं तिबेटमधील भारतीय सीमेजवळ अनेक बंधारे बांधले आहेत. भारतानं चीनला दिलेलं हे उत्तर मानलं जात आहे.
twitterfacebook
share
(1 / 4)

दिबांग नदीवर २७८ मीटर लांबीचे धरण बांधण्याचे नियोजन आहे. हे धरण काँक्रिटचे असेल. घोड्याची नाल जशी असते, त्या आकाराचं हे धरण असेल. या धरणाखाली ३०० ते ६०० मीटर लांब आणि ९ मीटर व्यासाचा बोगदा असणार आहे. या धरणाखाली भूमिगत वीजगृह असणार आहे. पाण्याच्या प्रवाहाचा वापर करून तेथून वीजनिर्मिती केली जाणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 4)

या भागातील पूर नियंत्रण, पाणीसाठवण आणि वीजनिर्मिती ही धरणाची मुख्य उद्दिष्टे असणार आहेत. २७८ मीटर लांबीचे हे धरण पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात उंच धरण ठरेल. जलविद्युत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश सरकारला प्रकल्पाच्या खर्चाच्या १२ टक्के रक्कम मिळणार आहे. दरम्यान, या भागातील आदिवासींना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांचा वारसा अबाधित राहावा यासाठी सरकार २४१ कोटी रुपये खर्च करणार आहे.   
twitterfacebook
share
(3 / 4)

अरुणाचलला खेटून असलेल्या तिबेटच्या सीमेवर चीननं अनेक गावे वसवली आहेत. त्या गावाच्या विकासाच्या नावाखाली तिथं पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. हे सर्व करून चीन भारताच्या सीमेवर लक्ष ठेवण्याची योजना आखत आहे. यापूर्वी भारतानं लडाख आणि अरुणाचलमध्ये चीनची आगळीक पाहिली आहे. या मुद्द्यावरून देशांतर्गत राजकारणातही मोदी सरकारवर प्रचंड दबाव आहे. चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी या नव्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचं अनेक विश्लेषकांचं मत आहे. आता या प्रकल्पाचं काम अधिकृतपणे सुरू होणार आहे.   
twitterfacebook
share
(4 / 4)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्य भारतासाठी नवीन औद्योगिक विकास योजनेचा शुभारंभ केला. त्यांनी अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीममधील प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. दिबांग प्रकल्प हा त्या प्रकल्पांपैकी एक आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्य भारतासाठी नवीन औद्योगिक विकास योजनेचा शुभारंभ केला. त्यांनी अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीममधील प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. दिबांग प्रकल्प हा त्या प्रकल्पांपैकी एक आहे.(ANI)
इतर गॅलरीज