पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भगवान कृष्णाच्या समुद्रात बुडालेल्या द्वारका या प्राचीन जलमग्न शहराच्या अवशेषांमध्ये थेट अरबी समुद्रात उडी मारून समुद्रांच्या तळाशी जाऊन या शहराच्या अवशेषांची पूजा केली.
(ANI)पंतप्रधान मोदींनी गुजरात जवळ अरबी समुद्रात बुडालेल्या भगवान कृष्णाच्या द्वारका या प्राचीन शहराची थेट समुद्रात पाण्याखाली जात या शहराच्या अवशेषांची पाण्याखालील पूजा केली.
(ANI)ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या द्वारका शहरात प्रार्थना करण्यासाठी पीएम मोदी यांनी स्कुबा डायव्हींग केले. या साठी स्कुबा ड्रेस परिधान करत पाण्यात उतरत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
(ANI)पीएम मोदींनी प्राचीन द्वारका शहराची स्थापना करणाऱ्या भगवान कृष्णाला आदरांजली म्हणून मोराचे पिस अर्पण केले.
(PTI)हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना, पीएम मोदी म्हणाले की त्यांना आध्यात्मिक भव्यता आणि प्राचीन युगातील भक्तीच्या नगरीशी मी जोडलो गेलो.
(PTI)"पाण्यात बुडलेल्या द्वारका शहरात प्रार्थना करणे हा एक अतिशय दैवी अनुभव होता. मला अध्यात्मिक भव्यता आणि त्या काळातील भक्तीच्या नगरीशी मी खऱ्या अर्थाने जोडलो गेलो. भगवान श्री कृष्ण आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो," असे अनुभव पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले आहेत.
(PTI)भगवान कृष्ण यांनी वसवलेले द्वारका हे एके काळी एक प्रसिद्ध आणि भरभराटीस आलेले शहर होते. मात्र, भगवान कृष्ण हे पृथ्वीवरून निघून गेल्यानंतर हे शहर गेल्या अनेक शतकंपासून समुद्राखाली बुडाले आहे.
(PTI)