मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  द्वारका नगरीच्या दर्शनासाठी पंतप्रधान मोदींची समुद्रात डुबकी, म्हणाले हा दिव्य अनुभव; पाहा PHOTOS

द्वारका नगरीच्या दर्शनासाठी पंतप्रधान मोदींची समुद्रात डुबकी, म्हणाले हा दिव्य अनुभव; पाहा PHOTOS

Feb 25, 2024 03:25 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

PM Modi In Dwarka : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील द्वारका येथे समुद्राच्या खोल पाण्यात गेले व प्रार्थना केली जेथे जलमग्न द्वारका नगरी आहे. मोदींनी म्हटले की, समुद्रातील द्वारका शहरात प्रार्थना करणे, हा एक दिव्य अनुभव होता. यामुळे मी अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडला गेलो.

पीएम मोदी यांनी पाण्याच्या आतमध्ये द्वारका नगरीला श्रद्धांजली अर्पण केली. मोदी आपल्यासोबत मोरपंख घेऊन गेले होते. ते त्यांनी समुद्राच्या आतमध्ये भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मोदी म्हणाले मी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारकेचे दर्शन घेतले. पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी समुद्रात बुडालेल्या द्वारकेविषयी खूप काही लिहिले आहे. म्हणतात भगवान विश्वकर्माने स्वत: या द्वारकानगरीचे निर्माण केले होते. आज मला खुप आनंद होत आहे. अनेक दशकांचे स्वप्न आज त्या पवित्र भूमीला स्पर्श करून पूर्ण झाले. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

पंतप्रधान मोदींनी म्हटले की, भगवान श्री कृष्णाची कर्मभूमि द्वारकाधामला मी श्रद्धापूर्वक नमन करतो. देवभूमी द्वारकामध्ये भगवान कृष्ण द्वारकाधीश रुपात विराजमान आहेत. येथे जे काही होते ते द्वारकाधीशाच्या इच्छेने होते. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी आज सकाळी बेट द्वारका येथील मंदिरात जाऊन दर्शन केले. त्यानंतर त्यांनी ओखाला बेट द्वारका द्वीपशी जोडणाऱ्या २.३२ किमी लांबीच्या समुद्री पुल  सुदर्शन सेतूचे उद्घाटन किया. हे देशातील सर्वात लांब पूल आहे, याचे भूमिपूजन मोदींनी  २०१७ मध्ये केले होते. या ब्रीजसाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

तीर्थक्षेत्र द्वारकानगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्वारकाधीश मंदिराचाही दौरा केला. त्यांनी येथे पूजा-अर्चना करत द्वारकाधीश भगवानाचे दर्शन केले. मोदींनी येथे दानही दिले. त्यांनी द्वारिका पीठाच्या शंकराचार्यांचेही दर्शन घेऊन त्यांना पुष्पमाला अर्पण केली.  शंकराचार्यांनी  मोदींना अंगवस्त्र आणि रुद्राक्षांची माळा भेट दिली. त्यानंतर मोदी बोटीतून समुद्राच्या मध्ये गेले व खोल समुद्रात उतरले. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज