पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (२० जानेवारी) तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील प्रसिद्ध श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.
(ANI)श्री रंगनाथस्वामी मंदिर हे भगवान विष्णूच्या पूजेसाठी सर्वात महत्वाचे मंदिर मानले जाते. या मंदिरात पूजा करण्यासाठी पंतप्रधान मोदी पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. पूजेनंतर पंतप्रधानांनी हत्तीला फळं खाऊ घातली.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरदेखील पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घातला होता. यानंतर ते आता येथील मंदिरात हत्तीला चारा खाऊ घालताना दिसले. एवढेच नाही तर मोदींनी गजराजांचे आशीर्वादही घेतले.
(ANI)पीएम मोदींना आशीर्वाद देणाऱ्या या हत्तीचे नाव 'आंदल' आहे. त्यांनी पंतप्रधानांसाठी माऊथ ऑर्गनही वाजवले. तत्पूर्वी या मंदिर परिसरात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. पीएम मोदींनी आपल्या वाहनातून हात दाखवत गर्दीला अभिवादन केले.
श्रीरंगम मंदिर हे श्री रंगनाथन यांना समर्पित हिंदू मंदिर आहे. श्रीरंगम मंदिर हे भारतातील सर्वात मोठे मंदिर संकुल आणि जगातील सर्वात मोठे धार्मिक संकुल आहे.
रंगनाथस्वामी मंदिर हे विजयनगर काळात (१३३६-१५६५) बांधले गेले असावे, असे मानले जाते. मंदिरातील देवतेचे निवासस्थान अनेकदा नाम पेरुमल आणि अढागिया मानवलन म्हणून ओळखले जाते.