पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यात कोठे राहणार? : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेच्या ब्लेअर हाऊस येथे राहणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी, ब्लेअर हाऊसवर भारतीय तिरंगा लावण्यात आला आहे. यावरून या भेटीचे महत्व अधोरीकेत होते.
(blairhouse.org)काय आहे खासियत? : प्रेसिडेंट गेस्ट हाऊस म्हणजेच ब्लेअर हाऊस हे जगातील सर्वात खास व सर्व सुविधांनी युक्त असे घर आहे. घर ७० हजार चौरस फूट जागेत पसरलेले आहे, ज्याला ४ टाउनहाऊस जोडण्यात आले आहे. या बंगल्यात तब्बल ११९ खोल्या आहेत ज्यात १४ अतिथी बेडरूम, ३५ बाथरूम, ३ मोठे जेवणाचे दालन आहेत. येथे लावण्यात आलेल्या छायाचित्रांमधून अमेरिकन इतिहास आणि कारागिरीचे दर्शन घडते.
(blairhouse.org)या ठिकाणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ द्वितीय, माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यासह अनेक जागतिक मान्यवर राहिले आहेत. १९ डिसेंबर १९५६ रोजी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील इंदिरा गांधींसोबत या ठिकाणी राहिले आहेत.
(blairhouse.org)दुसऱ्या महायुद्धादरम्यान खरेदी : दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन सरकारने ब्लेअर हाऊस खरेदी केले होते. तेव्हापासून ते राष्ट्रपतींचे अतिथीगृह म्हणून कार्यरत आहे. त्याच्या देखरेखीची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाची आहे. येथे राहणाऱ्यांमध्ये राष्ट्रप्रमुख, राजदूत आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे.
(blairhouse.org)ब्लेअर हाऊस कुठे आहे? : ब्लेअर हाऊसचा पत्ता देखील जगभरात प्रसिद्ध आहे. हे १६५१ पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू येथे, यूएस व्हाईट हाऊसच्या अगदी समोर आहे. हे अमेरिकन हिताचे प्रतीक मानले जाते. या बंगल्याचे बांधकाम हे १८२४ मध्ये पूर्ण झाले आणि १८३७ पासून ते अमेरिकन राजकारणाचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे.
(blairhouse.org)पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट : या दौऱ्यात मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र धोरणावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांनी असे सूचित केले आहे की काही संवेदनशील मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते. तथापि, मोदींच्या दौऱ्यातील अजेंडा काय असेल याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
(Reuters)ही बैठक खास का आहे? : पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा ट्रम्प २० जानेवारी रोजी पदभार स्वीकारल्यानंतर विविध देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मोदींच्या भेटीपूर्वी, ५ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील ३० जणांसह १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना पुन्हा भारतात पाठवण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईचा भाग म्हणून हद्दपार केलेल्या भारतीयांची ही पहिली खेप होती. तब्बल १८ हजार बेकायदेशीर भारतीयांना पुन्हा भारतात पाठवले जाणार आहे.
(PTI)भारतीय वंशाच्या तुलसी गॅबार्ड यांची मोदी यांनी घेतली भेट : पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच भारतीय वंशाच्या तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे बुधवारी अमेरिकन सिनेटने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनात राष्ट्रीय गुप्तचर संचालक पदावर गॅबार्ड यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. गॅबार्ड ही माजी लष्करी कर्मचारी आहे आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून काँग्रेस (अमेरिकन संसद) सदस्य आहे. सिनेटने ५२ विरुद्ध ४८ अशा मतांनी त्यांची नियुक्ती मंजूर केली.