पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पोहोचले. त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.
(ANI)सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की यूएस काँग्रेसला संबोधित करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.
(ANI)भारताच्या बळकट अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा मी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा अमेरिकेला भेट दिली, तेव्हा भारत जगातील १०वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आज भारत ही ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.
(PIB)कमला हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय, दक्षिण आशियाई आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडून आलेल्या महिला यांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “येथे लाखो लोक भारतीय आहेत. त्यांच्यापैकी काहीजण या सभेत अभिमानाने बसतात. माझ्या मागे देखील अशीच एक व्यक्ति आहे, ज्यांनी अमेरिकच्या राजकारणात इतिहास घडवला आहे.
(PIB)"अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना मोदी यांनी उपस्थित राहिलेल्या काँग्रेसच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांची ताकद आणि चांगल्या भविष्यासाठी वचनबद्धता दर्शवते. जागतिक शांततेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे देखील मोदी म्हणाले.
(ANI)यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने उभे राहून टाळ्या वाजवत मोदी यांना प्रतिसाद दिला.
(PIB)भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी 'मोदी, मोदी' आणि 'भारत माता की जय' या घोषणा देखील यावेळी दिल्या.
(ANI)