ग्लॅमरच्या जगात अभिनेत्रीच्या सौंदर्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अभिनेत्री आपल्या लूकबाबत नेहमीच सजग असतात. ग्लॅमरस लूक मिळवण्यासाठी अभिनेत्री विविध प्रयोग करत असतात. अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपला लूक आणखी सुंदर बनवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली…
चित्रपटसृष्टीत तिन्ही खानसोबत काम केलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही आपल्या चेहऱ्यावर प्रयोग केले आहेत. अनुष्का शर्मा आधीच खूप सुंदर अभिनेत्री आहे. परंतु तिने आणखी सुंदर दिसण्यासाठी तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिचे सौंदर्य आजही खूप चर्चेत आहे. पण, शिल्पाने तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला आहे. शिल्पा शेट्टी हिच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल्र अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार बनली आहे. तिने बॉलिवूड देखील गाजवले आहे. मात्र, आपल्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी तिने ओठ आणि भुवयांची सर्जरी केल्याचे म्हटले जाते.
बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रनौत हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती ग्लॅमर जगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, कंगनाने तिचे सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचा आधार घेतला होता.