आजपासून भारताने सिंगल यूझ प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर बंदी घातली आहे. त्यामुळे तुम्हाला पर्यायी व्यवस्थाही करावी लागेल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सरकारने पुढील पिढीचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे

फंक्शन्स आणि पार्टीसाठी वापरल्या जाणार्या प्लेट्स, चमचे आणि ग्लासेसवरही सरकारने बंदी घातली आहे. जगातही एक वापराच्या वस्तुंवर बंदी घालण्यात येत आहे.सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी धोकादायक आहे.
कँडी बॉक्स आणि सिगारेटच्या पॅकवर प्लॅस्टिक अस्तर लावण्यावरही आतापासून बंदी घालण्यात आली आहे. उत्पादकांनी त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी असही स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे.
(shutter stock)कान स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्या इअर बड्स प्लास्टिकच्या असतात. त्यामुळे त्यावरही बंदी घालण्यात आली होती. ८० देशांमध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. तर आफ्रिकेतल्या ३० देशांवर ही बंदी घालण्यात आली आहे.
प्लॅस्टिक स्ट्रॉ इत्यादींवर आता बंदी घालण्यात आली आहे. फुगे असो वा शीतपेये, आतापासून पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे.चीनमध्येही विघटन न होणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.
(shutter stock)

