Vastu Tips Peacock Feather : मोरपिसांनी बदला तुमच्या घराचं भाग्य, संपवा आर्थिक चणचण
Vastu Tips: घरात काही ठिकाणी मोरपिसं ठेवल्यास त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळतात असं वास्तुशास्त्र सांगतं.
(1 / 9)
वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपिसं ठेवणं अत्यंत उत्तम आणि शुभ मानण्यात आलं आहे. घरात राहूचा दोष असेल किवा राहूशी संबंधित काही पीडा असेल तर ते दोष घरातलं मोरपंख दूर करतं असं वास्तुशास्त्र सांगतं.
(2 / 9)
मोरपिसं दिसायला अत्यंत आकर्षक असतात. मात्र यांच्या घरात असण्याचा संपूर्ण घरावर सकारात्मक प्रभाव जाणवतो. मोरपंखांचे हेच सकारात्मक परिणाम काय आहेत हे आज आपण पाहाणार आहोत.
(3 / 9)
वास्तुशास्त्रानुसार, नियमानुसार मोराची पिसे घरात ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. सोबत भाग्याची साथ लाभते. घरात आर्थिक चणचण असेल तर ती दूर होते.
(4 / 9)
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत राहु अशुभ असेल तर घराच्या पूर्व आणि उत्तर-पश्चिम भिंतीवर मोराचं पीस लावा. असे केल्याने राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
(5 / 9)
कुंडलीतून राहू दोष कमी करण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला मोराचे पंख ठेवणे शुभ राहील. मुलांच्या खोलीत अभ्यासाच्या टेबलाजवळ एक किंवा दोन मोराची पिसे ठेवल्यास त्यांची अभ्यास आणि कलांची क्षमता सुधारेल.
(6 / 9)
तुमच्या घरात मोरपंख असेल तर धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करतात.
इतर गॅलरीज