प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या मोसमासाठी १५ ऑगस्ट रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. या लिलावात अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. अशा स्थितीत प्रो कबड्डी लीग २०२४ चे सर्वात महागडे खेळाडू कोणते आहेत? ते जाणून घेऊया.
सचिन तन्वर - मुंबईतील प्रो कबड्डी लीग लिलावाच्या अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. तर अनेक बड्या नावांना अपेक्षेप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. या लिलावात सचिन तंवर याला सर्वात मोठी किंमत मिळाली. अ श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या बचावपटू सचिन तंवरची बेस प्राईस ३० लाख रुपये होती, मात्र तामिळ थलायवास संघाने त्याला २ कोटी १५ लाख रुपयांना खरेदी केलेs. सचिनला घेण्यासाठी यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यातही जोरदार बोली युद्ध रंगले होते.
मोहम्मदरेझा चियानेह शादलौई- इराणचा अष्टपैलू मोहम्मदरेझा चियानेह शादलौई याच्यावरही पैशांचा वर्षाव करण्यात आला. या खेळाडूची मूळ किंमत ३० लाख रुपये होती आणि तो अ श्रेणीत होता. हरियाणा स्टीलर्सने मोहम्मदरेझा चियानेह शादलौईला २ कोटी ७ लाख रुपयांना विकत घेतले.
पवन सेहरावत- अ श्रेणीतील अष्टपैलू खेळाडू पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने १ कोटी ७२ लाख ५० हजार रुपयांना विकत घेतले. यापूर्वी, अ श्रेणीमध्ये समाविष्ट असलेला अष्टपैलू खेळाडू पवन सेहरावतसाठी ३० लाख रुपयांपासून बोली लागली होती. पवन सेहरावतला विकत घेण्यासाठी बेंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात चुरशीची लढत झाली. पण शेवटी पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने विकत घेतले.
भरत हुडा- अष्टपैलू खेळाडू भरतला बी श्रेणीत यूपी योद्धाने १.३० कोटी रुपयांना विकत घेतले. भरतची बोली २० लाख रुपयांपासून सुरू झाली. तेलुगू टायटन्स आणि यूपी योद्धाने या संघांनीही भरत जंकरसाठी बोली लावली, पण शेवटी यूपी योद्धाने भारतला १.३० कोटी रुपयांना साइन केले.