
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत १४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा लग्न केले. हार्दिकने राजस्थानमधील उदयपूरमध्ये हे लग्न केले. यापूर्वी, हार्दिक आणि नताशा यांनी २०२० मध्ये कोर्टात लग्न केले होते.
हार्दिकने आधी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि त्यानंतर त्याने हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरेही घेतले.
हार्दिकच्या लग्नाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीच हजेरी लावली होती, कारण जेव्हा हार्दिक आणि नताशाचे लग्न झाले तेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त होती.
लग्नाच्या एका आठवड्यानंतर हार्दिकने त्याच्या फेसबुकवर काही फोटो शेअर केले आहेत. हार्दिक आणि नताशाचे हे फोटो लग्नापूर्वीचे आहेत, जे खूपच सुंदर आहेत. यादरम्यान, हार्दिकची पत्नी नताशाच्या हातावर मेंदी लावल्याचे दिसून येत आहे.
हार्दिक आणि नताशाचे लग्न उदयपूरच्या राफेल हॉटेलमध्ये पार पडले. उदयपूरचे हे राफेल हॉटेल तलावाच्या मध्यभागी एका बेटावर बांधले आहे. हे आलिशान हॉटेल २३ एकरपेक्षा जास्त परिसरात पसरले आहे.
लग्नानंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा टीम इंडियात परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिकचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.




