(4 / 7)मुंबई महानगर प्रदेशासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा सागरी सेतू अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, या पुलामुळं मुंबई-गोवा महामार्ग, वसई, विरार आणि नवी मुंबई या शहरांसह रायगड जिल्हा देखील जोडला जाणार आहे. २०१८ साली या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. हा पूल साडेचार वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोविड महामारामुळं हा पूल पूर्ण होण्यास आठ महिने उशीर झाला.