बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर पहाटे १.३० वाजताच्या सुमारास बसला अपघात झाला
या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.