भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने शनिवारी (२३ नोव्हेंबर) पर्थ कसोटीत नवा विश्वविक्रम केला. यशस्वी जैस्वाल नवा 'सिक्सर किंग' ठरला आहे. खरं तर यशस्वीने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
(AP)नॅथन लायनने टाकलेल्या ५२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून यशस्वीने इतिहास रचला. त्याने २०२४ या एका वर्षात कसोटीत ३४ षटकार ठोकले आहेत.
(AFP)त्याआधी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मॅक्युलम याच्या नावावर होता. मॅक्युलमने २०१४ मध्ये ३३ षटकार ठोकले होते.
(AP)इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०२२ मध्ये २६वषटकार ठोकले होते.
(AP)कसोटीत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज- ३४ यशस्वी जैस्वाल, ३३ ब्रेंडन मॅक्युलम (२०१४) , २६ बेन स्टोक्स (२०२२) , २२ अॅडम गिलख्रिस्ट (२००५) , २२ वीरेंद्र सेहवाग (२००८)
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वालने पर्थमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारताकडून नाबाद ९१ धावा केल्या. या खेळीत यशस्वीने २ षटकार आणि ७ चौकार मारले. तो तिसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण करू शकतो.