आजपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात प्रवासी ताटकळले होते. त्यामुळं प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
आज एसटीचा संप असल्याने सणांकरता गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. ज्यांनी महिनाभर आधी रिझर्व्हेशन केले त्या प्रवाशांना देखील या संपामुळे फटका बसला.
पुण्यातून जाणाऱ्या कोल्हापूर, मिरज आणि सातारा बस देखील स्थानकातच उभ्या होत्या. कोल्हापूरातून पुणे-मुंबईकडे धावणाऱ्या बस सुरू आहेत. तर मिरज व सातारा स्थानकातून काही बसेस सोडण्यात आल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद आहेत. फक्त रात्री मुक्कामी असलेल्या गाड्या स्थानकाबाहेर पडणार आहेत. दरम्यान आजच्या संपात ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधी ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
या संपावेळी स्वारगेट बस स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.