Pune Swarget bus stand : बारामती बस स्टँड तुपाशी पुणेकरांचे स्वारगेट बस स्टँड उपाशी; प्रवाशांची गैरसोय
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Swarget bus stand : बारामती बस स्टँड तुपाशी पुणेकरांचे स्वारगेट बस स्टँड उपाशी; प्रवाशांची गैरसोय

Pune Swarget bus stand : बारामती बस स्टँड तुपाशी पुणेकरांचे स्वारगेट बस स्टँड उपाशी; प्रवाशांची गैरसोय

Pune Swarget bus stand : बारामती बस स्टँड तुपाशी पुणेकरांचे स्वारगेट बस स्टँड उपाशी; प्रवाशांची गैरसोय

Mar 04, 2024 09:44 AM IST
  • twitter
  • twitter
  • Pune Swarget bus stand issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच बारामती येथील सुसज्ज बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, पुण्यातील मध्यवर्ती स्थानक असलेले स्वारगेट आणि वाकडेवाडी बस स्थानकात अनेक गैरसोईंमुळे प्रवासी त्रस्त झाले आहे. या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन एसटी स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी येथील सध्याचे एसटी स्टँड आणि पुणे रेल्वे स्थानकां शेजारी असलेल्या बस स्थानकांची दुरवस्था झाली आहे. 
twitterfacebook
share
(1 / 7)

 स्वारगेट येथील एसटी स्टँड हे पुणे एमएसआरटीसी विभागातील मुख्य आणि इतर स्टँडच्या तुलनेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे बस स्थानक आहे. हे मध्यवर्ती बसस्थानक आहे. या स्थानकावरून रोज  १०,००० हून अधिक प्रवासी बेंगळुरू महामार्ग, सोलापूर महामार्ग आणि मुंबईकडे विविध मार्गांनी प्रवास करतात.
twitterfacebook
share
(2 / 7)

 या  स्टँडच्या मुख्य इमारतीमध्ये १०  लहान प्लॅटफॉर्म आणि प्रवाशांसाठी प्रतिक्षालयाची देखील व्यवस्था आहे. मात्र, या ठिकाणी असलेले बेंच पुरेसे नाहीत आणि जे आहेत त्यातलेही अनेक तुटलेले आहेत. या ठिकाणी स्वच्छता देखील राखली जात नाही.
twitterfacebook
share
(3 / 7)

स्टँडच्या परिसरात अनेक फुटपाथ आणि बेंच तुटलेले आहेत. “मी अनेकदा स्वारगेट एसटी स्टँडवरून प्रवास करतो आणि स्टँडवर एक मोठी समस्या म्हणजे दुचाकी आणि चारचाकी वाहने आत येतात. यांच्या वावर मोठा असल्याने या ठिकाणी येणाऱ्या बसेसना येथे फिरणे कठीण होते.  स्टँडमधून जाणाऱ्या खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टँडवर वाहतूक पोलिस नाहीत,” असे अमित डेंगळे या प्रवाशाने सांगितले.
twitterfacebook
share
(4 / 7)

वाकडेवाडी एसटी स्टँडवर खड्डे, गळके  छप्पर, तुटलेले फुटपाथ, स्टँडच्या आजूबाजूला फिरणारी भटकी कुत्री अशा अनेक समस्या आहेत. हे शहरातील दुसरे मोठे मध्यवर्ती स्थानक आहे. येथून  अहमदनगर, मुंबई-पुणे आणि इतर मार्गांवर बसेस धावतात. या स्टँडवरून तब्बल पाच हजार प्रवासी नियमित प्रवास करतात.
twitterfacebook
share
(5 / 7)

शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या स्टँडवरून दररोज प्रवासी ये-जा करतात मात्र स्टँडच्या आवारात देखभालीचा अभाव आहे. स्टँडवरील प्रवासी सागर चिंतल म्हणाले, “मी माझ्या कुटुंबासह आणि मुलांसह प्रवास करतो आणि कचरा भरलेल्या आणि नियमितपणे साफ न केलेल्या स्टँडवर जाणे खरोखरच लाजिरवाणे आहे. त्यात भर म्हणून भटकी कुत्री मोकाट फिरत आहेत. एमएसआरटीसी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेचा आधी विचार करायला हवा.
twitterfacebook
share
(6 / 7)

एमएसआयटीसीचे पुणे विभागीय नियंत्रक कैलास पाटील म्हणाले, “संपूर्ण विभागातील सर्व स्टँडवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. तरीही, आम्ही तपासणी करू आणि स्वारगेट आणि वाकडेवाडी एसटी स्टँडवर देखभालीची कामे केली जातील.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज