पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप शानदार क्लोजिंग सेरेमनीने झाला. या सोहळ्यासाठी भारताकडून 'परेड ऑफ नेशन्स'साठी भारतीय ध्वजवाहक म्हणून पीआर श्रीजेश आणि मनू भाकर यांची निवड करण्यात आली.
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात खूपच उत्साहाचे वातावरण होते. या सोहळ्यासाठी स्टेडियमचेच थिएटरमध्ये रूपांतर करण्यात आले.
(REUTERS)पॅरिस ऑलिम्पिक २०२४ हे भारतासाठी संमिश्र होते. भारताच्या खात्यात एकूण ६ पदके आली. पॅरिसमध्ये आयोजित ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पार पडले. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही.
(REUTERS)पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा फ्रान्समधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर झाला. हे फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
(AP)या सोहळ्यासाठी स्टेडियमचे थिएटरमध्ये रूपांतर करण्यात आले होते. स्टेडियमचा नजारा पाहण्यासारखा होता.
(AP)या सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपल्या जादूई परफॉरमन्सने सर्वांचे मनोरंजन केले. या समारोप सोहळ्यात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ देखील उपस्थित होता.
(AP)