(1 / 8)पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताने सहा पदकांसह आपल्या मोहिमेचा समारोप केला. नेमबाजीत तीन ब्राँझपदके मिळाली, तर हॉकी संघानेही ब्राँझपदक पटकावले. नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावले. अमन सहरावतने कुस्तीत ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावले, तर यंदाच्या ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना किमान सात पदके गमवावी लागली. भारताचे खेळाडू सहा वेळा चौथ्या स्थानावर राहिले. तर दुसऱ्या एका घटनेत कुस्तीपटूला अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आले.