मुलांचे आयुष्य घडवण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. पण त्यांच्या काही वागणुकीमुळे नकळत बालमनावर आघात होऊ शकतो. यामुळे मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो.
(Unsplash)घरगुती हिंसा पाहणे: पालकांमधील घरगुती संघर्ष मुलांसाठी क्लेशकारक असू शकतो. याचा मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.
(Unsplash)गैरवर्तन: मादक पदार्थांचे किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेले पालक त्यांच्या मुलांसाठी अस्थिर आणि क्लेशकारक वातावरण तयार करतात.
(Unsplash)दुर्लक्ष: अन्न, निवारा आणि भावनिक आधार या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे मुलांमध्ये दुर्लक्षाची भावना निर्माण होऊ शकते.
(Unsplash)शाब्दिक किंवा भावनिक गैरवर्तन: सतत टीका करणे, कमी लेखणे किंवा रागवणे यामुळे खोल भावनिक जखमा होऊ शकतात. मुलांसाठी हे वर्तन चांगले नसते.
(Unsplash)सीमांचा अभाव: विसंगत किंवा अस्पष्ट सीमांमुळे मुलांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण होऊ शकते. कारण त्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे किंवा वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कसे वागावे हे त्यांना माहिती नसते.
(Unsplash)भावनिक सोबत न देणे: स्वतःच्या तणावामुळे, मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे भावनिकदृष्ट्या तुटलेले पालक त्यांच्या मुलांच्या भावनिक गरजांकडेही अनवधानाने दुर्लक्ष करू लागतात. परिणामी त्याला असुरक्षित वाटू शकते.
(Unsplash)अवास्तव अपेक्षा: मुलाच्या शैक्षणिक, क्रीडा किंवा सामाजिक कार्यक्षमतेसाठी अत्याधिक अपेक्षा ठेवल्याने प्रचंड दबाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे अपयश येऊ शकते.
(Unsplash)