बरीच मुलं वाचायला बसल्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर काही जण वाचलेल्या गोष्टी विसरतात.तुम्हालाही ही समस्या असेल तर या टिप्स फॉलो करा जेणेकरून तुम्ही जे वाचता ते लक्षात ठेवू शकाल आणि परीक्षेत चांगले गुण मिळवू शकाल.
(pixabay)तुम्ही जे काही वाचता, त्याची स्वतःची परीक्षा घ्या, वाचलेल्या विषयांचे प्रश्न कागदावर लिहून त्यांची उत्तरे द्या, उत्तरात वाचलेली माहिती पूर्ण नसेल, तर पुन्हा वाचा आणि पुन्हा परीक्षा द्या.आता तुम्ही लिहिलेली माहिती पूर्वीपेक्षा जास्त चोख असेल, यामुळे तुम्ही जे वाचले ते तुम्हाला आठवेल.
(Pixabay)माइंड मॅपिंग आपल्याला आपण काय वाचले आहे, हे लक्षात ठेवण्यास आणि व्हिज्युअल स्वरूपात आपल्या विचारांचे वर्णन करण्यास मदत करू शकते. माइंड मॅपिंग एक सोपी, शक्तिशाली प्रक्रिया आहे, जी दृश्य स्वरूपात आपल्या विचारांचे वर्णन करते. जेणेकरून तुम्ही जे वाचता ते इतक्या सहजासहजी विसरू शकत नाही.
(Pixabay)जे समजतं ते स्वत:च्या विचारात, स्वत:च्या स्वरात, समजेल अशा पद्धतीने लिहा, जे दीर्घकाळ स्मरणात राहिल.
(Pixabay)दिवसभरात जास्त वाचू नका, दिवसाला किती वाचायचे आहे, याचे ध्येय ठेवा, त्याच दिवशी वाचन संपवा आणि यात यशस्वी व्हायचे असेल तर, लगेच वाचायला सुरुवात करा.परीक्षा जवळ आल्यावर वाचले तर काहीच आठवत नाही.
(Pixabay)आपण जे वाचता ते आपल्या मित्रांना, घरच्यांनाही समजावून सांगा, जेणेकरून परीक्षेत नक्कीच चांगले लिहू शकाल आणि चांगले गुण मिळवू शकाल.
मोठी वाक्ये लक्षात ठेवणे अवघड वाटत असेल, तर ते छोट्या वाक्यात लिहा. हे आपल्या मेंदूला संपूर्ण धडा लक्षात ठेवण्यास मदत करेल.
(Pixabay)