लुआना अलोन्सो हिची ऑलिम्पिक व्हिलेजमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली २० वर्षीय जलतरणपटू २७ जुलै रोजी महिलांच्या १०० मीटर बटरफ्लाय सेमीफायनलमध्ये पराभूत झाली. यानंतर पॅराग्वेच्या संघातून तिला मायदेशी परतण्यास सांगण्यात आले. अलोन्सोला अनैतिक वर्तनासाठी परिसर सोडण्याचे आदेश देण्यात आले.
ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहून लुआना अलोन्सो ही खेळाडूंमधील वातावरण बिघडवत असल्याचे सांगण्यात आले. द सन'ने ने दिलेल्या वृत्तानुसार ती इतर खेळाडूंचे मनोबल वाढवणे किंवा इतर खेळाडूंना आधार देण्याऐवजी पॅरिस येथील डिस्नेलँडला भेट देण्यासाठी एकटीच बाहेर पडली.
यानंतर शिक्षा म्हणून लुआना अलोन्सो हिला खेळातून काढून टाकण्यात आले. पॅराग्वे ऑलिम्पिक समितीचे प्रमुख लॅरिसा शायरर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “तिच्या उपस्थितीमुळे टीम पॅराग्वेमध्ये अयोग्य वातावरण तयार होत आहे.” कारण ती तिच्या मर्जीने अॅथलीट्स व्हिलेजमधून बाहेर पडली.
इन्स्टाग्रामवर ५६५ हजार फॉलोअर्स असलेल्या अलोन्सोने ऑलिम्पिकमध्ये भाग घेतानाचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "हे आता अधिकृत आहे! मी जलतरणातून निवृत्त होत आहे, पाठिंब्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार! सॉरी पॅराग्वे मला फक्त तुमचे आभार मानायचे आहेत!"
मात्र, नंतर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यात ती ऑलिंपिक पूलमध्ये डुबकी मारताना दिसत आहे. 'स्विमिंग: मला स्वप्न पाहण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही मला लढायला, प्रयत्न करायला शिकवलेत, चिकाटी, त्याग, शिस्त आणि बरेच काही शिकवले,' असे कॅप्शन तिने दिले आहे.
दरम्यान, २० वर्षीय जलतरणपटूने काल शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऑलिम्पिक व्हिलेजमधून हकालपट्टी केल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. लुआना अलोन्सो ने इन्स्टाग्राम स्टोरीजवर स्पॅनिश भाषेत लिहिले की, "मी फक्त हे स्पष्ट करू इच्छिते की मला कधीही काढून टाकण्यात आले नाही किंवा कुणीही काढून टाकण्यात आले नाही. खोटी माहिती पसरवणे बंद करा. मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही, पण खोटेपणाचा माझ्यावर ही परिणाम होऊ देणार नाही.