Papaya Leaves in Dengue: डेंग्यूसाठी उत्तम आहे हे पान! नियमित खाल्ल्याने टाळता येतो मोठा धोका
- Papaya Leaves For Dengue Fever: सर्वत्र पाऊस जोरात सुरु आहे आणि यासोबतच डेंग्यूचे प्रमाणही वाढत आहे.
- Papaya Leaves For Dengue Fever: सर्वत्र पाऊस जोरात सुरु आहे आणि यासोबतच डेंग्यूचे प्रमाणही वाढत आहे.
(1 / 5)
राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला असून दुसरीकडे डेंग्यूची समस्या देखील डोकं वर काढत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढतात. आणि ते डास चावल्याने संसर्गाचे प्रमाण वाढते.(Freepik)
(2 / 5)
शरीरात तीव्र वेदना होणे, पोट खराब होणे, वारंवार उलट्या होणे किंवा जुलाब होणे ही डेंग्यूची मुख्य लक्षणे आहेत. तसेच ताप, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. डेंग्यू असल्यास रक्तातील प्लेटलेट्सची पातळी कमी होते.(Freepik)
(3 / 5)
रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्यास शरीराची स्थिती बिघडते. रुग्णाला रुग्णालयात दाखल करून प्लेटलेट्स द्याव्या लागतात. पण हे पान खाऊन हे प्लेटलेट वाढवता येते.(Freepik)
(4 / 5)
ते पान म्हणजे पपईचे पान. डेंग्यू तापामध्ये हे पान अत्यंत उपयुक्त असल्याचे काही अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाणही वाढते. परिणामी मोठा धोका टाळता येतो. (Freepik)
(5 / 5)
मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या मते, पपईच्या पानांमध्ये अनेक अँटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात. हा गुण रोगाच्या जंतूंविरुद्ध काम करतो. त्यामुळे पपईची पाने औषध आणि आपत्कालीन उपचारांच्या सोबत सहाय्यक अन्न म्हणून ठेवली जाऊ शकतात.(Freepik)
इतर गॅलरीज