Papmochani ekadashi 2024 Date : पापमोचनी एकादशीचे व्रत कोणत्या दिवशी करायचे, जाणून घ्या तारीख, तिथी, पूजा पद्धत शुभ मुहूर्त आणि महत्व.
(1 / 10)
पापमोचनी एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी असेल. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यंदा ही एकादशी ५ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पापमोचनी एकादशीची नेमकी तिथी, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
(2 / 10)
पापमोचनी एकादशी तिथी आणि शुभ वेळ: हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवार, ४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४:१६ वाजता सुरू होईल आणि शुक्रवार ५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १ वाजता संपेल. उदय तिथीनुसार ५ एप्रिलला हे व्रत पाळण्यात येणार आहे.
(3 / 10)
पापमोचनी एकादशी पूजा पद्धत : या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. भगवान विष्णूसमोर व्रत करण्याचा संकल्प करा. यानंतर, आपले घर आणि देवघर पूर्णपणे स्वच्छ करा.
(4 / 10)
एकादशीच्या दिवशी चौरंगावर विष्णू व लक्ष्मीची मुर्ती किंवा फोटो ठेवावा. मनोभावे पूजा-पाठ करावा.
(5 / 10)
दही, दूध, मध, पाणी, तूप व तुळशीचे पान टाकून पंचामृत बनवून घ्यावे. या दिवशी पंचामृताने देवाचा अभिषेक करावा.
(6 / 10)
विष्णूदेवाला पिवळ्या रंगाची फुले, मिठाई, वस्त्र अर्पण करावे. पिवळा रंग सौभाग्य व संपन्नताचे प्रतिक मानले जाते, तसेच भगवान विष्णूचा प्रिय रंग पिवळा आहे.
(7 / 10)
भगवान विष्णूला त्यानंतर हळद किंवा गोपी चंदनाचा टिळा लावावा.(Freepik)
(8 / 10)
भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा. तसेच, देवाचे नामस्मरण करा.
(9 / 10)
भगवान विष्णूच्या पूजेत, नैवेद्यात तुळशीचा वापर अवश्य करावा. कारण विष्णू देवाला तुळस प्रिय आहे. असे मानले जाते की, तुळशी ही महाविष्णूची पत्नी आहे जिला महालक्ष्मीचे रूप आहे. ती महाविष्णूच्या गळ्यात हार म्हणून सदैव असते.
(10 / 10)
आरती करून पूजा संपवा आणि पूजेनंतर प्रसाद वाटून उपवास सोडा. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी श्रीमद्भागवताचे पठण केले पाहिजे, असे सांगितले जाते.