गुढीपाडव्यानिमित्त पंढरीचा विठुराया सजला.. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबेरंगी फुलांची आरास, PHOTOS
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  गुढीपाडव्यानिमित्त पंढरीचा विठुराया सजला.. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबेरंगी फुलांची आरास, PHOTOS

गुढीपाडव्यानिमित्त पंढरीचा विठुराया सजला.. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबेरंगी फुलांची आरास, PHOTOS

गुढीपाडव्यानिमित्त पंढरीचा विठुराया सजला.. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबेरंगी फुलांची आरास, PHOTOS

Updated Mar 22, 2023 12:02 PM IST
  • twitter
  • twitter
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीगेरंगी फुलांचा वापर करुन सुंदर अशी सजावट केली जाते. मंदिरात सजावट करण्यासाठी भाविकही उत्सुक असतात. आता मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर रंगबेरंगी फुलांच्या सजावटीने सजले आहे.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा आणि अन्य दर्शनी भागात केलेल्या या मनमोहक सजावटीमध्ये जवळपास ७०० किलो विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

मंदिराच्या सजावटीसाठी ४५० किलो शेवंती, ४० किलो गुलाबी कण्हेर, ४० किलो अश्टर, १०० किलो झेंडू, ५० जुड्या गुलाब इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब दिनकरराव पाचनकर यांनी ही सजावट विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

(विठ्ठल मंदिर ट्र्स्ट)
नूतन मराठी वर्षारंभ गुढीपाडवाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने श्रींच्या मंदिरात व सोळखांबी व सभामंडप येथे झेंडू , गुलाब, अस्तर, कण्हेरच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे ७०० किलो पाना फुलांचा वापर करुन मनमोहक आरास करण्यात करण्यात आली असून यामुळे मंदिराचे स्वरुप नयनरम्य दिसत आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही आरास पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. गुढीपाडव्यानिमित्त आजपासून तुळशी पूजा व चंदन उटी पूजेला सुरुवात होत असल्याने एकूणच मंदिरातील वातावरण आनंदीमय झाले आहे. 
twitterfacebook
share
(4 / 5)

विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रुप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत विठ्ठल  दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तर मंदिर समितीच्या संकेतस्थळावरुनही घरबसल्या भाविकांना मंदिरातील फुलांची आराज व विठुराचे दर्शन होत आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज