हिंदू ज्योतिषशास्त्रात पंचक हा अशुभ काळ मानला जातो. प्रत्येक महिन्यात पंचकचे काही दिवस असतात आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी प्रत्येक महिन्यात सुमारे ५ दिवसांचा असतो. हिंदू पंचांगानुसार, मे महिन्यातील पंचक गुरुवार, २ मे रोजी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवार, ६ मे रोजी संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी समाप्त होईल. या काळात वरुथिनी एकादशी, प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री हे तीन प्रमुख सणही साजरे केले जातील.
मे महिन्यात अग्नी पंचक सुरू होत आहे:
गुरुवार २ मे नंतर, दाढी करणे, वास्तूपूजा करणे किंवा नवीन वाहन खरेदी करणे यासारखे शुभ कार्य करू नये. असे केल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात. पंचकाचे पाच प्रकार आहेत, त्यापैकी सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचकास राज पंचक, मंगळवार आणि गुरुवारी सुरू होणाऱ्या पंचकांस अग्नि पंचक, शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकांला चोर पंचक म्हणतात, शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांस मृत्यु पंचक आणि रविवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांला रोग पंचक म्हणतात.
पंचक काळात काय करू नये :
पंचक काळात अंत्यसंस्कार करणे टाळावे. पंचक दरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास, पिठाच्या किंवा कुशाच्या पाच मूर्ती मृतदेहाजवळ ठेवाव्यात आणि नंतर प्रथेनुसार अंत्यसंस्कार करावे.