India vs West Indies 2nd Test : भारत आणि विंडिजमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाने धुंवाधार बॅटिंग करत सामन्याचा निकाल लावला आहे.
(BCCI Twitter)सतत होत असलेल्या पावसमुळं अखेरचा दिवस वाया गेल्याने सामना ड्रॉ करण्यात आला. परिणामी दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने १-० अशा फरकाने जिंकली आहे.
(BCCI Twitter)परंतु आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ होताच डब्ल्यूटीसीच्या क्रमवारीत मोठी उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात कमी गुण असूनही पाकिस्तानने यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.
(AP)केवळ एक कसोटी सामना जिंकलेल्या पाकिस्तानचे १२ गुण आहे. भारताचे १६ तर ऑस्ट्रेलियाचे २६ गुण आहेत. गुण कमी असूनही पीटीसीत पाकिस्तानचा संघ सर्वात पुढे आहे. त्यामुळं टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकून पाकिस्तानने पहिला क्रमांक मिळवला.
(AP)