मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Pakistan Cricketers Networth : शोएब मलिक सर्वात श्रीमंत... तर बाबर-शाहीनची कमाई किती? पाहा
- Pakistan Cricketers Networth : पाकिस्तान दिवाळखोरीच्या (pakistan crisis) उंबरठ्यावर आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. महागाईदेखील गगनानाला भिडली आहे. या कठीण परिस्थितीतही काही दिवसांत पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन केले जाणार आहे, याचे काउंटडाउनही सुरू झाले आहे. दरम्यान, कंगाल पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील हे ५ खेळाडू (richest pakistani cricketer) खूप श्रीमंत आहेत.

(1 / 6)
Babar Azam net worth- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची संपत्ती ४० कोटींच्या जवळपास आहे. त्याचे मासिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, यात जाहिरातीसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कराराचा समावेश आहे.
(2 / 6)
shoaib malik net worth - पाकिस्तानच्या सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत शोएब मलिकचे नाव आघाडीवर आहे. त्याच्याकडे बोर्डाचा करार नाही, पण त्याची एकूण संपत्ती २ अब्जांच्या जवळपास आहे. मात्र, त्याची मासिक कमाई इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तो महिन्याला ३ लाख रूपये कमावतो.
(3 / 6)
shan masood net worth - पाकिस्तानच्या श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये शान मसूदचाही समावेश आहे. त्याची एकूण संपत्ती ३२ कोटींच्या जवळपास आहे. शानकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा करार आहे. तो महिन्याला जवळपास १ लाख ८० हजार रूपये कमावतो.
(4 / 6)
fakhar zaman net worth - पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि सलामीवीर फखर जमानची एकूण संपत्ती ४० कोटींच्या जवळपास आहे. त्याच्याकडे पीसीबीचे कॉन्ट्रॅक्ट आहे. तो महिन्याला ५० लाख रूपये कमावतो.
(5 / 6)
shaheen afridi net worth - पाकिस्तानचा स्टार गोलंदाज आणि शाहीद आफ्रिदीचा जावई शाहीन शाह आफ्रिदीची एकूण संपत्ती ५५ कोटींच्या जवळपास आहे. त्याच्याकडेही पीसीबीचे कॉन्ट्रॅक्ट आहे. तो महिन्याला ५० लाख रूपये कमावतो.
इतर गॅलरीज