नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला काही नवीन कंटेंट रिलीज होतो. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काही चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये हॉरर आणि कॉमेडी या दोन्हीचा समावेश आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…
कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर त्याच्या शोचा दुसरा सीझन पूर्ण करत आहे. दर आठवड्याला शोचा एक नवीन भाग प्रदर्शित होतो. त्यामुळे या शनिवारी तुम्हाला कपिल शर्माच्या शोचा दुसरा एपिसोड पाहता येणार आहे.
हा एक भयपट आहे जो शुक्रवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ही काही मित्रांची गोष्ट आहे. त्यामधील एकाची गर्लफ्रेंड ही भयानक असते. तिचे वागणे पाहून सर्वांना भीती वाटू लागते.
मिस्टर मैकमहोन ही खेळावर आधारित वेब सीरिज आहे. विन्स मॅकमोहनच्या नेतृत्वाखाली WWE ने अनेक विक्रम केले. त्याचबरोबर काही वाईट काळही पाहिले. ही मालिका तुम्हाला या जगात घेऊन जाईल. ही मालिका बुधवारी प्रदर्शित होत आहे.
हा एक माहितीपट आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये एका सुधारक अधिकाऱ्याचे चित्रण करण्यात आले आहे जो खुनाच्या खटल्यात असलेल्या एका माणसाच्या प्रेमात पडतो. नंतर, ती त्याला तुरुंगातून पळून जाण्यास मदत करते. बुधवारी हा माहितीपट प्रदर्शित होणार आहे.
फायनल डेस्टिनेशन ही अमेरिकन हॉरर फ्रँचायझी आहे. त्याचे पहिले तीन भाग शनिवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहेत.